Tue. Jun 22nd, 2021
मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय

मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय: कै.सौ.वेणूताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ,खानापूर संचलित मातोश्री वेणूताई चव्हाण माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.आनंदराव चव्हाण यांचा सेवानिवृती संमारंभ नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगली जि.प.चे माजी सदस्य सुहास (नाना) शिंदे बोलत होते. ज्ञानदानाच्या या पवित्र सेवेतून आपण सेवामुक्त होत आहात, सेवामुक्ती म्हणजे कोणत्याही कामाचा शेवट नसून जीवनातील नव्या पर्वाची.. नव्या मार्गावरून.. पुन्हा नव्याने सुरुवात आहे. असे प्रतिपादन सुहास (नाना) शिंदे यांनी केले.

श्री.आनंदराव चव्हाण हे तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून मुक्त झाले. त्यांनी 1991 पासून आजपर्यंत (मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय) मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्विकारून प्रामाणिक व निष्ठेने सेवा केली. श्री.आनंदराव चव्हाण यांचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून संस्थेचे संचालक व माजी.जि. प. सदस्य श्री.सुहास नाना शिंदे आणि संस्थेचे सचिव श्री.धैर्यशील पवार यांच्या शुभहस्ते करुन त्यांना उर्वरित आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिव श्री.धैर्यशील पवार, श्री.सचिन पाटील,न्यू इंग्लिश स्कूल भूडचे मूख्याध्यापक शिवाजीराव पवार, सौ.शोभादेवी पवार इंग्लिश मेडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री.उत्तम पाटील,प्रा. प्रशांत चव्हाण, व श्री.दिलीप निंबाळकर सर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संस्थापक डॉ.के.आर.पवार (दादा) यांच्या निधनानंतर हा पहिलाच कार्यक्रम आतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये कोव्हिड 19 च्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात आला.

मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय खानापूर
श्री. डी. एम.निंबाळकर मुख्याध्यापक पदी निवड

संस्थेचे सचिव श्री.धैर्यशील पवार यांनी (मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय) मुख्याध्यापक पदांची जबाबदारी श्री. डी. एम.निंबाळकर यांच्यकडे सोपवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूल’चे मुख्याध्यापक शिवाजीराव पवार, सूत्रसंचलन प्रा.संभाजीराव गायकवाड व आभार श्री.संजय माळी यांनी मानले. यावेळी कन्हैया स्वामी, सर्व शाखेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Content By – Prof. Sambhajirao Gaikwad

हेही वाचा – कोविड 19 पासून बरे झालेल्या लोकांवर ब्लैक फंगस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *