Sun. Jul 25th, 2021
मानवी वस्तीत शिरले मगर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात. (मानवी वस्तीत शिरले मगर) तर काही व्हिडीओ हे अंगाचा थरकाप उडवतात. सध्या असाच एक चकित करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर थेट मानवी वस्तीमध्ये घुसली असून ती रस्त्यावर फिरते आहे. दांदेलीमधील (Dandeli) कोगिलबान (Kogilban) गावातील ही घटना आहे. (video of crocodile found in kogilban village karnataka went viral on social media)

मानवी वस्तीत शिरले मगर, भर वस्तीत मगर घुसली

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठी मगर दिसते आहे. ती एका वस्तीमध्ये घुसली असून मोठ्या दिमाखात भर रसत्यावर फिरते आहे. यावेळी रस्त्यामध्ये मगरीला पाहून कुत्रेसुद्धा जमा झाल्याचे दिसते आहे. (मानवी वस्तीत शिरले मगर) मानवी वस्तीमध्ये आल्यामुळे व्हिडीओतील मगर थोडी गोंधळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मानवी वस्तीत मगर घुसल्याचे समजताच सगळीकडे गोंधळ उडाला आहे. रस्त्यावर कोणी दिसत नसले तरी लोकांचा आरडाओरडा सुरु असल्याचे व्हिडीओला पाहून समजते आहे.

हेही वाचा – काजू-बदाम खाणारा बोकड !

वन अधिकऱ्यांनी मगरीला नदीत सोडले

हा व्हिडओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन अधिकारऱ्यांनी या वस्तीमध्ये येऊन मगरीला ताब्यात घेतले. तसेच या मगरीला नदीमध्ये सोडण्यात आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *